पंकजा आणि धस आपने सामने | ऊसतोड कामगार संभ्रमात | Pankaja Munde Vs Suresh Dhas | Maharashtra News

2021-09-13 1

एक नेता म्हणतो कोयतो घ्या आणि फडात जायला तयार व्हा तर दुसरा नेता म्हणतो की मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत कोयता हातात घेणार नाही. त्यामुळे कारखाने सुरु झाले असताना ऊसतोड कामगार संभ्रमात सापडला आहे. ऊसतोड कामगार संपाच्या प्रश्नावरुन आता बीड जिल्ह्यातील वातावरण चांगलंच तापल्याच चित्र आहे. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी पक्षाच्या आदेशावर पंकजा मुंडेचा फोटो लावून राज्यभरात दौरे केले पण आता पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्यातच यावर ठिणगी पडल्याची चर्चा आहे. दोन नेत्यांनी वेगवेगळी विधानं केल्यामुळे आता हे मतभेद उघड झाल्याचे दिसून येते. ऊसतोड कामगारांच्या संपाचा प्रश्न केवळ दोन बैठकांमध्ये सुटला असता. पण तसे होऊ न देण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक केले जात असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या. तसेच त्यांनी ऊसतोडणी संप काळात पक्षाच्या वतीने काढलेल्या पत्रावरही नाराजी व्यक्त केली. जाणून घेऊया पंकजा मुंडे काय म्हणाल्या.

#lokmat #PankajaMunde #SureshDhas #MaharashtraNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Videos similaires